गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 19 डिसेंबर 2022 (11:28 IST)

झारखंडमध्ये इलेक्ट्रिक कटरने मृतदेहाचे 50 तुकडे केले

Crime
दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडा नंतर झारखंडमधील साहिबगंजमधून असेच एक हृदयद्रावक प्रकरण समोर आले आहे. झारखंडमध्ये ही घटना दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडापेक्षाही भयंकर पद्धतीने पार पडली. या घटनेतील आरोपीने दुसऱ्या पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 50 तुकडे करून फेकले. साहिबगंज येथील बोरिया संथाली येथील एका निर्माणाधीन अंगणवाडी केंद्राच्या मागे मानवी अवयवाचे तुकडे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी अंगणवाडी केंद्राच्या पाठीमागे एका व्यक्तीने महिलेच्या पायाचे कापलेले तुकडे कुत्र्याने खाताना पाहिल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पती दिलदार अन्सारी याला अटक केली आहे.जिल्ह्यातील बोरीओ येथे 22 वर्षीय तरुणीची हत्या करून मृतदेहाचे इलेक्ट्रिक कटरने 50 तुकडे करून फेकण्यात आले.या तरुणीचे नाव रुबिका पहारिया आहे .आरोपी दुसरा कोणी नसून तिचा पती दिलदार अन्सारी आहे.  
 
साहिबगंजमध्ये आरोपी दिलदार हा आपल्या पत्नी सोबत राहायचा.तिने दोन महिन्यांपूर्वी रुबिकाशी लग्न केले आणि लग्नानंतर बेलटोला येथील घरी राहत होते. त्यांच्या सोबत दिलदारची पहिली पत्नी देखील राहायची. दिलदारच्या पहिल्या पत्नीचा या दुसऱ्या लग्नाला विरोध होता. लग्नानंतर काही दिवसांनीच दिलदारचे पत्नीशी भांडण सुरू झाले. अखेर भांडणाला कंटाळून त्याने रुबिकाला आयुष्यातून काढण्याची योजना आखली त्याने जे काही कृत्य केले ते धक्कादायक आहे. त्याने रुबिकाची हत्या केली आणि नंतर    इलेक्ट्रिक कटरने तिच्या मृतदेहाचे 50  तुकडे केले. त्यानंतर अंगणवाडी केंद्राच्या मागे फेकले. काही तुकडे त्याने घरात लपवून ठेवले. रबिका ही दिलदारची दुसरी पत्नी असून आदिवासी समाजातील होती. ती साहेबगंज भागात डोडा वस्तीत राहायची तीचे दिलदारवर प्रेम असून त्यांनी दोन महिन्यांपूर्वी लग्न केलं होत. त्यांच्या लग्नाला विरोध होता. शनिवारी ही घटना उघडकीस आली असून आरोपी दिलदारला अटक केले आहे. 
 
Edited By- Priya Dixit