सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (15:38 IST)

म्हैसूरमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, प्रियकराला केली बेदम मारहाण

कर्नाटकमध्ये एका मुलीवर कथितरित्या सामूहिक बलात्कार करण्यात आला. या दरम्यान, म्हैसूरजवळ दरोडेखोरांच्या टोळीला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिच्या प्रियकराला मारहाण करण्यात आली. एफआयआरनुसार, शहराच्या बाहेरील चामुंडी हिल्सला भेट देताना एका टोळीने दोघांना घेरले आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली.
 
त्यांनी सांगितले की जेव्हा नकार दिला तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. या महिलेवर दोन पुरुषांनी बलात्कार केला आणि तिच्या प्रियकराला टोळीच्या सदस्यांनी मारहाण केली. घटनेनंतर जवळपास 24 तासांनंतरही आरोपी बेपत्ता आहेत. त्याचवेळी दोन्ही पीडितांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर म्हणतात की दोघेही आता बरे आहेत.
 
पोलिसांनी म्हटले आहे की अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलीचे बयान अद्याप नोंदवले गेले नाही. म्हैसूर शहरापासून सुमारे 13 किमी अंतरावर चामुंडी हिल्स हे राज्यातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे जेथे प्रसिद्ध श्री चामुंडेश्वरी मंदिर आहे. राज्याची राजधानी बेंगळुरू येथून सुमारे 150 किमी दूर आहे.