शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 11 जानेवारी 2018 (11:45 IST)

भारत आणि कॅनडातल्या सामंजस्य कराराला मान्यता

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारत आणि कॅनडा यांच्यातल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या करारामुळे, भारत आणि कॅनडामधल्या शैक्षणिक संस्था तसेच संशोधन आणि विकासात वैज्ञानिक सहकार्याचा वेग वाढवण्यासाठी आणि त्यासाठी यंत्रणा पुरवणे सोयीचे होणार आहे.
 
ठळक वैशिष्ट्ये 
* या कराराद्वारे, भारत आणि कॅनडा यांच्यात संशोधन आणि विकास सहकार्याचे कल्पक मॉडेल राबवण्यात येणार आहे.
 
* विज्ञान तंत्रज्ञानाच्या उपयोगातून सामाजिक परिवर्तनासाठी उपाय सुचवण्याचा, संशोधन आणि विकास प्रकल्पाचा उद्देश आहे.
 
* भारत आणि कॅनडा मधल्या वैज्ञानिक संघटना, शैक्षणिक संस्था, संशोधन प्रयोगशाळा यांचा यात सहभाग राहील.
 
* सुरक्षित आणि शाश्वत पायाभूत सुविधा, एकात्मिक जलव्यवस्थापन यांचा सहकार्य क्षेत्रात समावेश राहील.
 
* वैज्ञानिक संस्था, वैज्ञानिक आणि तज्ज्ञ यांच्यात संस्थात्मक जाळे विकसित करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे.