भारताने उडवला पाकिस्तानचा लाँच पॅड
India Pakistan war : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानने सीमावर्ती भागात हल्ले केल्यानंतर भारताने प्रत्युत्तर देऊन दहशतवादी लाँच पॅड नष्ट केले आहे. अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या लष्करी 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान हादरला आहे. पाकिस्तान जम्मू-काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करत आहे.
गेल्या २४ तासांत पाकिस्तानने २६ ठिकाणी हल्ले केले. यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी अधूनमधून गोळीबार सुरू आहे.
पाकिस्तानी माध्यमांचा दावा आहे की त्यांच्या तीन हवाई तळांवर हल्ला करण्यात आला आहे. तसेच, भारताने अद्याप हल्ल्याची पुष्टी केलेली नाही.