1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

15 नोव्हेंबरला मिळणार ‘पीएम किसान’चा हप्ता

installment of PM Kisan will be available on November 15
पीएम किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत दिलेली रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. यापूर्वी 27 जुलै 2023 रोजी पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आला होता.

आता सरकारने पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दिली जाते. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ देशातील सर्व विभागातील शेतकऱ्यांना उपलब्ध होतो.