गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मे 2017 (17:04 IST)

राजस्थानचे शर्मा अमेरिकन लष्करात वैज्ञानिक, तब्बल 1.2 कोटीचे पॅकेज

राजस्थानच्या मोनार्क शर्मा यांना अमेरिकन लष्करात वैज्ञानिक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. अमेरिकेच्या लढाऊ हेलिकॉप्टर युनिटमध्ये तो काम करणार आहे. यासाठी अमेरिकन लष्कर मोनार्क शर्माला वार्षिक तब्बल 1.2 कोटी रुपयांचे पॅकेज देत आहे. अमेरिकेच्या लष्करात नुकताच एएच-64ई हा लढाऊ हेलिकॉप्टर समाविष्ट करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टरच्या डिझाईन, निरीक्षण, उत्पादन आणि काळजी घेण्याची जबाबदारी मोनार्कला दिली आहे.
 
अमेरिकन लष्करात वर्षभरात दाखल होणारे AH-64E या हेलिकॉप्टरचे डिझाइन, त्याची निर्मिती आणि संशोधन करण्याची जबाबदारी शर्मा यांच्याकडे देण्यात आली आहे. शर्मा यांनी 'नासा'मधून कनिष्ठ संशोधक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर मे २०१६मध्ये शर्मा यांनी अमेरिकने लष्करात प्रवेश केला. शर्मा यांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे त्यांना २०१६मध्ये 'आर्मी सर्व्हिस मेडल' आणि 'सर्वोत्तम सुरक्षा' पुरस्कार मिळाले. 
 
शर्मा यांनी नासाने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ६वा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्यांनी नासामध्ये काम सुरु केले. चंद्रावरून मातीचे नमुने गोळा करण्याच्या यंत्र निर्मितीमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले होते.