बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 13 ऑगस्ट 2023 (17:54 IST)

Jaisalmer Accident : भारत-पाक सीमेजवळ मोठा अपघात, बीएसएफचा ट्रक उलटला, 16 जवान जखमी एक ठार

accident
Jaisalmer Accident : राजस्थानमधील जैसलमेरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बीएसएफचा ट्रक पलटी झाल्याने सुमारे 16 जवान जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. 
 
या वाहनात बीएसएफचे149 जवान होते. दरम्यान, भारत-पाक सीमेजवळील रस्त्यावरील खड्ड्यांपासून वाचवण्यासाठी ट्रकचा तोल गेल्याने हा अपघात झाला. ट्रक खड्ड्यात पलटी झाला, यात सुमारे 16 जवान जखमी झाले आणि एका जवानाचा मृत्यू झाला, जो कर्तव्यासाठी भारतीय सीमेकडे जात होता. संजय कुमार (एसके दुबे) असे मृत जवानाचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. ज्याचे वय सुमारे 40 वर्षे होते. जखमी जवानांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे बीएसएफ जवानांमध्ये शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे जवान आणि अधिकारी जिल्हा रुग्णालयात पोहोचले. सध्या तीन जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बीएसएफचे अधिकारी जखमी जवानांवर योग्य उपचारासाठी लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनही तत्परतेने सहकार्य करत आहे. 
 
 


Edited by - Priya Dixit