रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2017 (16:13 IST)

राजौरीत पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानने मंगळवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आहे. राजौरीच्या भीमभेर गाली सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार आणि मॉटर्र शेलचा मारा केला. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. अजूनही हा गोळीबार सुरु आहे. गोळीबारात भारताच्या बाजूला कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. राजौरी-पूँछ जिल्ह्यात 24 तासात पाकिस्तानने तिस-यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.