1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2017 (12:27 IST)

काश्मीरच्या बँकांमधील रोख व्यवहार ठप्प होणार

दक्षिण काश्मीरमधील जम्मू अॅण्ड काश्मीर बँकेने आपल्या शाखांमधील रोखीचे व्यवहार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जम्मू अॅण्ड काश्मीर बँकेच्या ४० शाखांमधील व्यवहार ठप्प होणार आहेत. यापैकी बहुतेक शाखा या पुलवामा आणि शोपियान येथील आहेत.
 
गेल्या सहा महिन्यात काश्मीरमध्ये बँकेवर १३ वेळा हल्ला करण्यात आला असून तब्बल ९२ लाखांची रोकड लुटून नेण्यात आली आहे. यापैकी चार घटना या महिन्याच्या सुरूवातीलाच घडल्या आहेत. १ मेला दहशतवाद्यांनी जम्मू अॅण्ड काश्मीर बँकेच्या पैसे नेणाऱ्या गाडीवर हल्ला चढवला होता. यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात पाच पोलीस आणि दोन बँक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता.