बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जून 2023 (10:16 IST)

Jammu Kashmir: दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, 5 विदेशी दहशतवादी ठार

Kupwara Encounter : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील एलओसीच्या जुमागुंड भागात झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलांचे ऑपरेशन अजूनही सुरू आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी दहशवादी पक्ष सक्रिय झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने परिसरात शोधमोहीम राबवली. जेव्हा सुरक्षा दल लपण्याच्या दिशेने गेले तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.  
 
सुरक्षा दलांनी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि ऑपरेशन डोगा नर अंतर्गत मंगळवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले. ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
 
लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत J&K पोलीस आणि इतर सहयोगी यंत्रणांकडून माहिती मिळाली होती. या आधारे 12 आणि 13 जूनच्या मध्यरात्री माछिल सेक्टरमधील डोगा नार परिसराला जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी घेराव घातला होता. 
 
यादरम्यान अनेक ठिकाणी मोर्चेबांधणी करण्यात आली.लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जंगल परिसर असल्याने विशेष खबरदारी घेत परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. अवघड भागात जवानांनी रात्रभर मोर्चा रोखून धरला. 
 






Edited by - Priya Dixit