गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (14:16 IST)

Jharkhand:खासदार - आमदारांची रस्त्यावर बाचाबाची

झारखंड मध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधक त्यांच्यात जुंपली आहे. साहिबगंजतील एकाच पक्षाचे खासदार आणि आमदार यांच्यात रस्त्यातच बाचाबाची झाली.सदर घटना बाबा साहिबगंजच्या तीन पहारच्या बाकुंडीची असून रस्त्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात जेएमएम आमदार लोबीन हेम्ब्रम आणि खासदार विजय हासदा हे एकमेकांच्या समोर आले.

खासदार विजय हासदा  हे रस्त्याची पायाभरणी करत असताना आमदार लोबीन हेम्ब्रम यांना पायाभरणीचे आमंत्रण दिले नाही. या वर ते संतापले आणि थेट समारंभात जाऊन खासदारांना सुनावले यावर आमदार लोबीन हेम्ब्रम आणि खासदार विजय हासदा यांच्यात बाचाबाची झाली . लोबीन यांनी पायाभरणीच्या कार्यक्रमाला थांबविण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे. 
 
 Edited by - Priya Dixit