शुक्रवार, 20 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2024 (14:47 IST)

कैलाश गेहलोत यांचा आप पक्षाला राम राम,भाजपमध्ये दाखल म्हणाले आपला सोडणे सोपे नव्हते

नजफगडचे आमदार कैलाश गहलोत यांनी आप पक्षाला राम राम करून भाजपच्या पक्षात प्रवेश केला आहे.यांना केंद्रीयमंत्री मनोहरलाल यांनी भाजप मुख्यालयाचे सदस्यत्व दिले. या वेळी भाजपचे बडे नेते देखील उपस्थित होते. 

गहलोत यांनी बोलताना सांगितले की, मी आजपर्यंत  कोणाच्याही दबावाखाली काम केलं नाही. पण मी सध्या असे ऐकत आहे की मी सीबीआयच्या दबावाखाली हे केलं. हे चुकीचे आहे. हा माझा निर्णय एकदिवसाचा नाही. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर हजारो लोक एका विचारधारेत सामील झाले. राजकारणात माझा येण्याचा उद्देश्य जनतेची सेवा करणे असून ज्या कारणास्तव मी आप पक्षात सामील झालो ते त्याच्याऱ्हास पाहून मी थक्क झालो. 

हे मत फक्त माझ्यापुरती मर्यादित नसून आमआदमी पक्षाचे इतर कार्यकर्त्ये देखील असाच विचार करत आहे. एखादे सरकार जर सतत केंद्र सरकारशी भांडत असेल तर हे चुकीचे आहे. अशाने दिल्लीचा विकास कसा होणार? या पेक्षा अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा. दिल्लीच्या विकासासाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करता यावे यासाठी मी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान मोदींच्या धोरणांनी मी प्रभावित झालो आहे. 
 
कैलाश गेहलोत यांनी रविवारीच आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. कैलाश गेहलोत यांनी 19 फेब्रुवारी 2015 रोजी पहिल्यांदा दिल्ली सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून शपथ घेतली. 
दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी नजफगडचे आमदार कैलाश गेहलोत यांच्याकडून मंत्रीपद स्वीकारले.

दिल्ली सरकारमध्ये ते परिवहन मंत्री होते. दरम्यान, कैलाश गेहलोत यांच्याविरोधात ईडी आणि आयकर प्रकरणे प्रलंबित असल्याचे आम आदमी पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच्यावर ईडी आणि इन्कम टॅक्सने अनेकदा छापे टाकले आहेत. अशा परिस्थितीत हा छापा टाळण्यासाठी त्यांच्याकडे भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. हा भाजपचा घाणेरडा कारस्थान आहे. ईडी आणि सीबीआयच्या जोरावर भाजपला दिल्लीची निवडणूक जिंकायची आहे.
Edited By - Priya Dixit