गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑक्टोबर 2024 (14:31 IST)

पीएम मोदींच्या हस्ते 12 हजार कोटींहून अधिक किमतीच्या आरोग्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

narendra modi
धन्वंतरी जयंती आणि 9व्या आयुर्वेद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) येथे आयोजित कार्यक्रमात सुमारे 12,850 कोटी रुपयांच्या विविध आरोग्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार आज 150 हून अधिक देशांमध्ये आयुर्वेद दिन साजरा केला जात आहे ही देशासाठी आनंदाची बाब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तसेच आयुर्वेदाकडे वाढत्या जागतिक आकर्षणाचा हा पुरावा आहे. भारत आपल्या प्राचीन अनुभवांवरून जगाला किती नवीन देऊ शकतो याचा हा पुरावा,  असे देखील मोदी म्हणालेत.
 
यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना धनत्रयोदशी, भगवान धन्वंतरी जयंती आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान म्हणाले की, यंदाची दिवाळी ऐतिहासिक असल्याचे सांगून  "500 वर्षांनंतर अशी संधी आली आहे, जेव्हा अयोध्येतील त्यांच्या जन्मभूमीवर बांधलेल्या रामलल्लाच्या मंदिरात हजारो दिवे प्रज्वलित होतील. हा एक अद्भुत उत्सव असेल. जेव्हा आपला राम पुन्हा एकदा आपल्या घरी आला असेल, आणि यावेळी ही प्रतीक्षा 14 वर्षांनी नाही तर 500 वर्षांनी संपत आहे असे देखील पीएम म्हणालेत. 

Edited By- Dhanashri Naik