शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2024 (17:30 IST)

पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेस आणि मालगाडीच्या धडकेत 9 जणांचा मृत्यू, असा झाला अपघात

rail accdent
पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकून मोठा अपघात झाला आहे. या अपघातातील मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे, तर 46 जण जखमी झाले आहेत. सोमवारी (17 जून) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
 
कांचनजंगा एक्सप्रेस आसामच्या गुवाहाटीहून पश्चिम बंगालच्या सियालदहला जात होती. या अपघातामुळं 8 रल्वे रद्द झाल्या आहेत, तर 24 रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
 
न्यू जलपैगुडीजवळ ही गाडी उभी होती, तेव्हा मालगाडी येऊन धडकली. कांचनजंगा एक्सप्रेसचे तीन डबे अपघातामुळे रुळावरून घसरले.
 
दार्जिलिंगचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिषेक रॉय यांनी माध्यमांना सांगितले की, "कांचनजंगा एक्सप्रेस उभी होती आणि पाठीमागून आलेल्या मालगाडीने टक्कर दिली. त्यामुळे तीन डब्बे पटरीवरुन उतरले आहेत. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. आम्ही त्यांना बाहेर काढले आहे आणि रुग्णालयात दाखल केले आहे."
मालगाडी पायलटने सिग्नल तोडला
मालगाडीला धडकल्यानंतर कांचनजंघा एक्सप्रेसचा मागचा भाग पूर्णपणे हवे लटकत असल्याचं घटनास्थळावरील फोटोंंवरून स्पष्ट होत होतं.
 
रेल्वे बोर्डाचे सीईओ आणि अध्यक्ष जया वर्मा यांच्या मते मालगाडीनं सिग्नल तोडत कांचनजंघा एक्सप्रेसला मागून धडक दिली. या धडकेनं कांचनजंघा एक्सप्रेसच्या मागच्या बाजुला गार्डचा डबा आणि दोन पार्सल व्हॅनचं प्रचंड नुकसान झालं आहे.
अपघातावेळी दोन्ही एक्सप्रेस एकाच पटरीवरून धावत होत्या.
 
कांचनजंघा एक्सप्रेसमधील सुमारे 1300 सुरक्षित प्रवाशांना त्याच रेल्वेच्या सुरक्षित डब्यांमधून पुढं रवाना करण्यात आलं, असं नॉर्थ फ्रंटियर रेल्वेच्या प्रवक्त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
या घटनेत मालगाडीच्या ड्रायव्हरसह कांचनजंघा एक्सप्रेसच्या गार्डचाही मृत्यू झाला आहे.
 
असा झाला अपघात
रविवारी सकाळी कांचनजंघा एक्सप्रेस त्रिपुराची राजधानी आगरतळाहून सियालदहकडे रवाना झाली होती.
 
गुवाहाटी स्टेशन मार्गे ही रेल्वे निघाली होती. सोमवारी सकाळी सुमारे 8 वाजता कांचनजंघा एक्सप्रेस रेल्वेनं पश्चिम बंगालमधील न्यू जलपैगुडी रेलवे स्टेशन ओलांडलं.
 
त्यावेळी ही रेल्वे जवळपास अर्धातास उशिराने धावत होती. त्यानंतर काही वेळानं सुमारे पाऊणे नऊ वाजता कांचनजंघा एक्सप्रेस रंगापानी-छत्रसाल रेल्वे सेक्शनमध्ये पोहोचली. त्यावेळी मागून येणाऱ्या एका कंटेनर ट्रेननं या रेल्वेला धडक दिली.
 
या अपघातानंतर कांचनजंघा एक्सप्रेसचा मागचा भाग आणि मालगाडीच्या इंजीनसह त्याचा पुढचा भाग पटरीवरून उतरला.
 
रेल्वेकडून जया वर्मा यांनी जी माहिती दिली आहे, त्यानुसार मुताबिक़ मालगाडी थांबवण्यासाठी लाल सिग्नल देण्यात आला होता. पण पायलटनं गाडी थांबवली नाही. पुढं जाऊन ती कांचनजंघा एक्सप्रेसला धडकली.
 
रेल्वे मेन्स फेडरेशनचे महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांनी केलेल्या दाव्यानुसार, मालगाडीचा पायलट सततच्या ड्युटीमुळं प्रचंड थकलेला होता. त्यामुळं त्याला आरामाची गरज होती. पण सोमवारी त्याला पुन्हा ड्युटी देण्यात आली होती.
 
नुकसान भरपाईची घोषणा
रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव यांनी घटनेनंतर मृतांच्या कुटुंबासाठी 10 लाखांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
 
त्याशिवाय गंभीर जखमींसाठी 2.5 लाख आणि किरकोळ जखमी असणाऱ्यांसाठी 50 हजार नुकसान भरपाईची घोषणा करण्यात आली आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की, NFR झोनमध्ये दुर्भाग्यपूर्ण घटना घडली आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
 
हेल्पलाइन नंबर- लुमडिंग स्टेशन
 
03674263958
 
03674263831
 
03674263120
 
03674263126
 
03674263858
 
हेल्पलाइन नंबर-गुवाहाटी स्टेशन
 
03612731621
 
03612731622
 
03612731623
 
हेल्पलाइन नंबर- कटिहार
 
09002041952
 
9771441956
 
कोण काय म्हणाले?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे झालेला रेल्वे अपघात दुर्भाग्यपूर्ण आहे. या कठीण काळात माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करते.
 
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या प्रियजनांसोबत आमच्या सहवेदना आहेत. या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. मी परिस्थितीचा आढावा घेतला असून बचावकार्य सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्वनी वैष्णव हे थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचतील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, दार्जिलिंगमधील फांसीदेवा येथे झालेल्या दुर्घटनेमुळे मला धक्का बसला आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा बचावकार्य तत्परतेने करत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी हा अपघात दुःखद असल्याचं म्हटलं आहे. विरोधक या प्रकरणी जबाबदारीनं वागतील आणि मोदी सरकारला या घटनेसाठी जबाबदारी ठरवेल. गेल्या 10 वर्षांमध्ये रेल्वे अपघातांमध्ये झालेली वाढ ही सरळ-सरळ मोदी सरकारच्या खराब व्यवस्थापणाचा परिणाम आहे. त्यामुळं अनेकदा प्रवाशांचं नुकसान होत आहे.

Published By- Priya Dixit