रविवार, 29 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2024 (18:15 IST)

ECI ने 7 राज्यांतील 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक जाहीर केली

voting
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 7 राज्यांतील 13 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक घेण्याची घोषणा केली आहे. 10 जुलै रोजी निवडणूक होणार असून 13 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यात बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे.
 
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, ज्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत त्या जागांसाठी अधिसूचना 14 जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 जून असेल. 24 जून रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 
 
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 जून आहे. 10 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीत बिहारमधील एका विधानसभेच्या जागेवर, पश्चिम बंगालमधील 4 जागांसाठी, तामिळनाडूतील 1, मध्य प्रदेशातील 1, उत्तराखंडमधील 2, पंजाबमधील 1 आणि हिमाचलमधील 3 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 
 
पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या  मानिकतला, राणाघाट दक्षिण, बागडा, रायगंज या   चार जागांवर  पोटनिवडणूक होणार आहे
 
बिहार विधानसभेची 1 जागा रुपौली या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
 
तामिळनाडू विधानसभेची 1 जागा विक्रावंदी या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. तर 
हिमाचल प्रदेशच्या 3 जागा डेहरा, हमीरपूर, आणि नालागड या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. 
उत्तराखंडच्या 2 जागा बद्रीनाथ आणि मंगळूर आणि पंजाबची 1 जागा जालंधर पश्चिम या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit