शनिवार, 28 सप्टेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 8 जून 2024 (16:14 IST)

ब्रेकफास्ट मध्ये बनवा रवा आणि बटाट्याचे कृकुरीत डोसे, लिहून घ्या रेसिपी

दैनंदिन जीवनात सकाळची वेळ ही धावपळीची असते. अशावेळेस प्रत्येक दिवशी काय नवीन बनवावे हे कधीकधी सुचत नाही. तर चला आज आम्ही तुम्हाला नवीन झटपट बनणारी रेसिपी सांगणार आहोत. तर चला जाणून घेऊ या रवा आणि बटाट्याचे कुरकुरीत डोसे, चला लिहून घ्या रेसीपी 
 
साहित्य-
2 बटाटे 
2 हिरव्या मिरच्या 
अर्धा चमचा मीठ 
अडीच कप पाणी 
अर्धा कप तांदळाचे पीठ 
बारीक कापलेला कांदा 
हिरवी कोथिंबीर 
जिरे 
लाल तिखट 
 
कृती-
बटाट्याचे साल काढून ते धुवून घ्या. व चार तुकड्यांमध्ये कापून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात बटाटा तुकडे, हिरवी मिरची, मीठ घालावे. पाणी टाकून याची पेस्ट बनवून घ्या. आता या पेस्टमध्ये अर्धा कप रवा, अर्धा कप तांदळाचे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करा. तयार पेस्ट मध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालावे. आता या मिश्रणाला थोडे पातळ बनवा. तसेच नॉनस्टिक तव्यावर हे मिश्रण घालून एक मिनिटामध्ये डोसा तयार. हा डोसा तुम्ही कोठल्याही चटणीसोबत सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.  
 
Edited By- Dhanashri Naik