रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

भूक लागली आहे का? बनवा चविष्ट झटपट ब्रेड पुलाव, जाणून घ्या रेसिपी

Tips To Buy Bread
सध्या उन्हाळा सुरु आहे. मुलांना देखील सुट्टी लागली आहे. संध्याकाळी प्रत्येकाला छोटी छोटी भूक लागते. अश्यावेळेस काय करावे सुचत नाही. म्हणून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो  आहोत झटपट बनेल असा ब्रेड पुलाव, तर चला लिहून घ्या रेसिपी 
 
साहित्य- 
2 चमचे तेल 
1 चमचा मोहरी 
1 चमचा हिरवी मिर्चीचे तुकडे 
60 ग्रॅम कांदा 
1/2 चमचा मीठ 
1/4 चमचा हळद 
1/4 चमचा तिखट 
1/4 धणे पूड 
1/4 गरम मसाला 
60 ग्रॅम टोमॅटो 
60 ग्रॅम शिमला मिर्ची 
120 ग्रॅम ब्रेड स्लाइस 
1 चमचा केचअप 
भाजलेले शेंगदाणे 
 
कृती- 
ब्रेड पुलाव बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करावे तसेच त्यामध्ये मोहरी घालावी. मग हिर्वी मिरची, कांदा, मीठ, हळद, तिखट, धने पूड, गरम मसाला टाकून दोन मिनिट शिजवावे. मग मध्ये टोमॅटो, शिंमला मिर्ची घालावी. मग परत दोन मिनिट शिजल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेल्या ब्रेडच्या स्लाइस घालाव्या. व त्यावर केचप टाकावे. दोन मिनिट शिजवल्यावर यावर भाजलेले शेंगदाणे घालावे. तर चला तयार आहे आपला गरमागरम, झटपट ब्रेड पुलाव. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Published By- Dhanashri Naik