शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

चविष्ट डाळ पालक, जाणून घ्या रेसिपी

Dal-Palak
डाळ पालक ही एक चविष्ट रेसिपी तर आहेच पण आरोग्यसाठीसाठी देखील फायदेशीर आहे. चला लिहून घ्या चविष्ट डाळ पालक रेसिपी कशी बनवावी. 
 
साहित्य- 
1 वाटी मुगाची डाळ 
बारीक चिरलेला पालक 
1 टोमॅटो 
1 चमचा जिरे 
1 चमचा हळद 
1 चमचा तिखट 
3 हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या 
1 कांदा बारीक चिरलेला 
8-10 लसूण पाकळ्या 
1 छोटा तुकडा आले 
चवीनुसार मीठ 
पाणी गरजेनुसार 
तेल गरजेनुसार 
 
कृती- 
डाळ पालक बनवण्यासाठी सर्वात पहिले पालक स्वच्छ धुवून घ्यावा. नंतर कुकरमध्ये तेल घालावे. मग गरम झालेल्या तेलामध्ये जिरे आणि हिंग घालावे. मग यानंतर हिरवी मिरची, कांदा, लसूण, आले टाकावे. मग या मध्ये कापलेला पालक घालावा. यानंतर हळद, तिखट, मुगाची डाळ, टोमॅटो, थोड्या प्रमाणात पाणी, मीठ टाकून एक उकळी एस पर्यंत थांबावे. मग कुकरचे झाकण लावून 2-3 सिटी झाल्यानंतर गॅस बंद करावा. तयार आहे चविष्ट डाळ पालक, गरम सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik