सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Updated : शनिवार, 1 जून 2024 (08:08 IST)

केळीचे रायते तुम्ही कधी ट्राय केले का? तर चला लिहून घ्या रेसिपी

रायते हा शब्द ऐकल्यावर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. फार क्वचित लोक असतात की ज्यांना रायते कमी आवडते. तसे पाहिला गेले तर रायते हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. तुम्ही आतापर्यंत बुंदी,काकडी, अननस, इत्यादी वस्तूंचे रायते खाल्ले असेल. पण आज आम्ही तुम्हाला केळाचे रायते कसे बनवावे याची रेसिपी सांगणार आहोत. हे केळीचे रायते चविष्ट तर असते पाम आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. तर चला लिहून घ्या केळीचे रायते रेसिपी 
 
साहित्य- 
2 केळे 
2 कप ताजे दही 
1 हिरवी मिरची बारीक कापलेली 
अर्धा चमचा जिरे पूड 
अर्धा चमचा साखर 
चवीनुसार मीठ 
बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर 
 
कृती- 
केळीचे रायते बनवण्यासाठी पिकलेले केळी घेऊन ते कापून बाऊलमध्ये ठेवावे. आता बाऊलमध्ये दही घेऊन ते फेटावे. मग यामध्ये वरील सर्व साहित्य घालावे. मग या मिश्रणमध्ये कापलेले केळ घालावे. वरतून कोथिंबीर घालावी. आता तयार झालेले केळीचे रायते फ्रिज मध्ये थंड होण्यासाठी ठेवावे. मग सर्वांना सर्व्ह करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 
Edited By- Dhanashri Naik