1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

कुटुंबासाठी बनवा कैरी कॉर्न खमंग ढोकळा, जाणून घ्या रेसिपी

Kairi Corn Khamang Dhokla
तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी काही हेल्दी आणि नवीन डिश ट्राय करू इच्छित आहात का? तर आज आम्ही तुम्हाला ढोकळ्याची एक रेसिपी. चला लिहून घ्या कैरी कॉर्न खमंग ढोकळा   
 
साहित्य 
1/2 कप मकईचे पीठ 
3/4 कप रवा 
2 मोठे चमचे बेसन 
1 कप कैरीची प्युरी 
2 कप ताक 
1 मोठा चमचा आले लसूण हिरवीमिर्चि पेस्ट
11/2 छोटा चमचा इनो फ्रूट साल्ट
चवीनुसार मीठ 
2 मोठे चमचे कुकिंग ऑइल 
1 छोटा चमचा मोहरी 
1/4 छोटा चमचा हिंग 
2 मोठे चमचे किसलेले नारळ 
बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर 
1 कैरी किसलेली 
 
कृती 
किसलेल्या कैरीला ताकासोबत मिक्स करून बारीक करा. आता एका बाऊलमध्ये मक्याचे पीठ घ्यावे, त्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालावी, मग रवा, बेसन, मीठ, कैरीची प्युरी आणि उरलेले ताक टाकावे. चांगल्याप्रकारे एकत्रित करून बाजूला ठेवावे. 30 मिनट नंतर मिश्रण घट्ट वाटले तर त्यामध्ये थोडे ताक घालावे. आता अर्धा चमचा इनो एक चमचा पाण्यासोबत मिक्स करून टाकावे. मग तेल लावलेल्या पॅनमध्ये हे मिश्रण टाकने 15-20 मिनट स्टीम होण्यासाठी ठेवावे. मग स्टीम झाल्यानंतर ऑइल गरम करावे. हींग आणि मोहरीचा तडका बनवावा आणि स्टीम्ड ढोकळ्यावर टाकावे. आता ढोकळ्याला चौकोनी आकारात कापून हिरवी कोथिंबीर, किसलेले नारळ टाकावे व कुटुंबाला सर्व्ह करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik