सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

चविष्ट पत्ताकोबी ग्रेवी भाजी, लिहून घ्या रेसिपी

पत्ताकोबीची भाजी सर्वजण एकाच पद्धतीने बनवतात. यावेळेस आपण बनवू या टेस्टी स्पाईसी ग्रेवीदार पत्ताकोबीची भाजी. घरी आलेल्या पाहुण्यासाठी देखील तुम्ही बनवू शकतात. तसेच दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात देखील ट्राय करू शकतात. चला तर लिहून घ्या चविष्ट ग्रेवी असलेली पत्ताकोबी भाजी रेसिपी 
 
साहित्य- 
एक पत्ताकोबी 
एक काप बेसन 
दोन ते तीन कांदे 
एक चमचा धणे पूड 
गरम मसाला 
तिखट 
चिमूटभर बेकिंग सोडा 
दोन टोमॅटोची पेस्ट 
आले-लसूण पेस्ट 
एक कप दही 
 
कृती- 
पत्ताकोबीचे सर्व पाने वेगवेगळे करून गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. मग एका पातेलीत बेसन घेऊन त्यामध्ये वरील सर्व मसाले टाकावे. तसेच चिमूटभर बेकिंग सोडा टाकावा. आता तयार केलेल्या मसाले युक्त बेसनला पत्ताकोबीच्या प्रत्येक पानावर लावावे. व पॅक करावे. आता हे पत्ताकोबीचे पाने दहा मिनिटांसाठी वाफवून घ्यावे. 
 
भाजीची ग्रेवी बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून जिरे घालावे. सोबत बारीक कापलेला कांदा घालावा. मग धणे पूड आणि तिखट घालावे. मग मध्ये टोमॅटो पेस्ट घालावी. मग टोमॅटो पेस्ट शिजल्यानंतर त्यामध्ये दही घालावे. दही चांगले परतवावे. मग यामध्ये पत्ताकोबीचे बनवलेले पीस घालावेत. तयार आहे आपली पत्ताकोबी ग्रेवी भाजी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik