रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2024 (16:32 IST)

उन्हाळयात हे दोन प्रकारचे रायते आहे आरोग्यदायी, जाणून घ्या रेसिपी

Veg Raita Recipe
उन्हाळ्यात सर्वांना थंड काहीतरी खावेसे वाटते. अश्यावेळेस रायते हा एक चांगला पर्याय आहे. रायते स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. 
 
रायता मध्ये दही असते जे तुम्हला उन्हाळ्यामध्ये हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. 
 
रायता मध्ये असलेले दही प्रोबायोटिक्सने परिपूर्ण असते, जे तुमच्या पाचनतंत्राला सुरळीत आणि आरोग्यदायी ठेवते. 
 
रायता मध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात. जसे की, प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी. 
 
1. पुदिना रायते 
साहित्य-
1 कप दही
अर्धा कप कापलेला पुदिना 
अर्धा कप कापलेली हिरवी कोथिंबीर 
अर्धा चमचा जिरे पूड 
अर्धा चमचा काळे मीठ 
चवीनुसार मीठ 
 
कृती- 
एका बाऊलमध्ये दही, पुदिना, कोथिंबीर, जिरे पूड, काळे मीठ आणि मीठ टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा. मग फ्रिजमध्ये 30 मिनिट थंड होण्यासाठी ठेवावे. मग सर्व्ह करावे. 
 
2. काकडी रायते 
साहित्य-
1 कप दही 
1 किसलेली काकडी 
अर्धा कप कापलेली हिरवी कोथिंबीर 
अर्धा चमचा जिरे पूड 
अर्धा चमचा काळे मीठ 
चवीनुसार मीठ 
 
कृती- 
एका बाऊलमध्ये दही, किसलेली काकडी, हिरवी कोथिंबीर, जिरे पूड, काळे मीठ, मीठ टाकून चांगले मिक्स करा. मग 30 मिनिट फ्रिजमधये थंड होण्यासाठी ठेवावे. मग सर्व्ह करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik