गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 नोव्हेंबर 2024 (14:45 IST)

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

ऋषभ शेट्टी दिगदर्शित कांतारा चॅप्टर 1चित्रपटातील कनिष्ठ कलाकारांसोबत एक अपघात झाला आहे. त्यांना घेऊन जाणारी बसचा अपघात झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. 

सदर घटना कर्नाटकातील कोल्लूर जवळील जडकल जवळ सेटच्या दिशेने जाणाऱ्या  मिनीबस उलटून अपघात झाला असून अपघात झाला त्यात 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालायात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या बस मध्ये 20 ज्युनिअर कलाकार होते. 
 
या अपघाताने सिने विश्वात खळबळ उडाली आहे. अपघातात अनेक जण जखमी झाले आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 
जखमी लोकांचे आरोग्य अपडेट अद्याप प्रतीक्षेत आहेत. तसेच टीम त्याच्या लवकरात लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा देत आहे.
रिषभ शेट्टी यांनी नुकतीच कांतारा चॅप्टर 1 ची रिलीज डेट शेअर केली असून चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 
Edited By - Priya  Dixit