मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (17:01 IST)

Karnataka news राष्ट्रगीतादरम्यान विद्यार्थ्यानीला हार्ट अटॅक!

कर्नाटक: शाळेत राष्ट्रगीत म्हणत असताना दहावीच्या  विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला, मृत्यू झाला
या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील शिक्षक व मुलांना मोठा धक्का बसला आहे.  
 
कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका शाळेत सकाळच्या संमेलनात राष्ट्रगीत म्हणत असताना एका विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला. शाळा व्यवस्थापनाशी संबंधित लोकांनी तात्काळ विद्यार्थिनीला रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टर तिचे प्राण वाचवू शकले नाहीत. दुसरीकडे, माहिती मिळताच पोलिसांनी शाळेत पोहोचून घटनेची माहिती घेतली. पोलिसांनी  विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
 
पेलिशा असे मृत विद्यार्थिनीचे नाव सांगितले जात आहे. तिचे वय 16 वर्षे सांगितले जात आहे. ही घटना घडली ती शाळा चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट येथे आहे. ही विद्यार्थिनी या शाळेत दहावीत शिकत होती. शाळा व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, दररोजप्रमाणे बुधवारी सकाळी शाळेचे संमेलन होत असताना सर्व मुले राष्ट्रगीत म्हणत होती. यादरम्यान विद्यार्थ्याची प्रकृती खालावली.
तिले तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र…
 
सुरुवातीला शाळेतील शिक्षकांना वाटले की तिला चक्कर येणे सारखी समस्या आहे, परंतु नंतर पेलीशाची तब्येत बिघडू लागली. यानंतर शिक्षकांनी विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी मुलीचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
 
मुलीला हृदयविकाराचा झटका आला
डॉक्टरांच्या मते, प्रथमदर्शनी, विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आला असावा. विद्यार्थ्याचे पालक तेथे नव्हते असे सांगण्यात येत आहे. ती अनाथ होती आणि निर्मला शाळेच्या वसतिगृहात राहत होती. या घटनेनंतर शाळेत एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील शिक्षक व मुलांना मोठा धक्का बसला आहे. शाळेतील शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, पेलिशा एक होतकरू विद्यार्थिनी होती. ती वाचण्यातही चांगली होती. पेलिशा आता या जगात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.