सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (11:02 IST)

हिजाब घालणं इस्लाममध्ये अनिवार्य नाही- कर्नाटक उच्च न्यायलय

Karnataka Hijab Ban Stays
इस्लामिक धार्मिक प्रथांप्रमाणे हिजाब परिधान करणं हे आवश्यक नसल्याचं मत कर्नाटक उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे.
 
विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हिजाब घालण्यासाठी परवानगी देण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयाने आज (15 मार्च) निकाल जाहीर केला.
 
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने हिजाब वाद प्रकरणी आपला निकाल दिला आहे. हिजाब हा इस्लामचा भाग नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ते म्हणाले की शैक्षणिक संस्था अशा प्रकारचे कपडे आणि हिजाबवर बंदी घालू शकतात. या आदेशाने हायकोर्टाने हिजाबला परवानगी मागणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.
 
उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने निकाल देताना म्हटले की, हिजाब घालणे हा इस्लामचा आवश्यक भाग नाही. मुस्लिम संघटना आणि विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावत खंडपीठाने सांगितले की, हिजाब घालणे अनिवार्य नाही, शैक्षणिक संस्था वर्गात हिजाब घालण्यास बंदी घालू शकतात.