बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (16:27 IST)

पतीला अफेयरबद्दल कळलं तर पत्नीने पेट्रोल ओतून पतीला पेटवलं; मग दगडानं ठेचून हत्या

कर्नाटकातील तुमाकुरू जिल्ह्यातील बद्दीहल्ली भागात एक अतिशय खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. येथे एका महिलेने कथितरित्या तिच्या पतीला पेट्रोल ओतून आगीने पेटवलं आणि नंतर तिच्या प्रियकराने दगडाने त्याचे डोके ठेचून खून केला. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही संपूर्ण घटना दिवसा उजेडात घडली.
 
मृताचे नाव 52 वर्षीय नारायणप्पा असे आहे, जो एका खाजगी फर्ममध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. त्याच्या पत्नीचे (36 वर्षे) रामकृष्ण नावाच्या 35 वर्षीय शेजाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप आहे. रामकृष्ण सूदवर कर्ज देऊनही पैसे कमवायचे.
 
 
रामकृष्णावरून नारायणप्पा आणि अन्नपूर्णा यांच्यात वारंवार भांडणे होत होती. अन्नपूर्णाच्या अफेअरबाबत रविवारी पुन्हा दोघांमध्ये भांडण सुरू झाले. या चर्चेदरम्यान अन्नपूर्णाने रागाच्या भरात नारायणप्पावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. अहवालानुसार रामकृष्णही घटनास्थळी उपस्थित होता.
 
बातमीनुसार, आग लागताच, नारायणप्पा लगेच घरातून पळून जवळच्या नाल्यात पडले. यामुळे आग विझली, पण जेव्हा तो नाल्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा रामकृष्णाने त्याचे डोके दगडाने ठेचले. यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
 
या घटनेनंतर पोलिसांनी अन्नपूर्णा आणि रामकृष्ण यांना अटक केली. घटनेच्या वेळी या जोडप्याच्या तीन मुलीही घरात उपस्थित होते. मोठी मुलगी 14 वर्षांची आहे, जी तिच्या वडिलांच्या हत्येची प्रत्यक्षदर्शी देखील आहे, तर 12-  12 वर्षांच्या दोन जुळ्या बहिणी त्या वेळी खोलीत होत्या.