शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (21:44 IST)

किरीट सोमय्या सोमवारी दोन नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्यासाठी कंबर कसली आहे.  शिवसेनेचा नेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री आपल्या रडारवर आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. सोमवारी पत्रकरा परिषद घेत दोन्ही नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.
 
किरीट सोमय्या यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. यमध्ये त्यांनी माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात २४ हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पानं आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे, असं सोमय्या म्हणाले.
 
दरम्यान, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस दिल्लीत चर्चा करणार आहेत. त्यांनी मला सूट दिलेली आहे. सोमवारी हे नाव उघड करणार आहे. तुम्ही चांगले काम करता. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे, असं फडणवीसांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे मला सुरक्षा मिळालेली आहे आणि मला सर्व अधिकार आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं.