Kota : 1 रुपया आणि नारळ घेत नवरदेवानी बांधली लग्नगाठ
हुंडा देणं आणि घेणं हे कायदेशीर गुन्हा आहे. तरीही अजून काही ठिकाणी हुंडा दिला आणि घेतला जातो. अजून देखील देशात हुंड्यासाठी महिलांचा शारीरिक मानसिक छळ केला जातो. तर काही भागात हुंडा न घेता लग्न केले जातात. अशीच घटना कोटा जिल्ह्यातील सुलतानपूरच्या दरबीजी गावात घडली आहे. या ठिकाणी नवरदेवाने हुंडा न घेता केवळ रुपया आणि नारळ घेत समाज समोर नवे आदर्श ठेवत नववधूशी लग्नगाठ बांधली. मुकेश मीणा असे या नवरदेवाचे नाव असून मुकेश सुलतानपूर पोलीस ठाण्यात हवालदार आहे. त्याने दरबीजी गावातील रामावतार मीणा यांची कन्या सुमनशी लग्नगाठ बांधली.
लग्नात हुंडा घेणार नाही असे मी ठरवले होते. हुंडा प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेत आज समाजासमोर मुकेश मीणा यांनी नवे आदर्श ठेवले आहे. वधू पक्षाकडून नवरदेवाला एक लाख रुपये आणि इतर वस्तू हुंड्यात दिले होते. मात्र नवरदेव मुकेश आणि त्याच्या वडिलांनी वधूच्या वडिलांना ते सन्मानाने परत दिले तेव्हा वधूच्या वडिलांना आपण कुठे चुकलो आहोत असे वाटले पण नवरदेव मुकेशने मला काहीही नको फक्त 1 रुपया आणि नारळ द्यावा असा निरोप पाठवला. तेव्हा वधू पक्षाकडील लोकांना आणि आलेल्या पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुकेशच्या निर्णयाचे सर्व कौतुक करत आहे. जिथे वधूचे वडील मुलीच्या सासरच्यांना हुंडा देण्यासाठी कर्जबाजारी होतात तिथे मुकेशने हुंडा न घेता समाजासमोर आदर्श ठेवले आहे.
Edited by - Priya Dixit