लालू यादव यांची मागणी फेटाळली
माजी पंतप्रधान तथा ज्येष्ठ भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृती संदर्भात माहिती जाहीर करण्याची राजद नेते लालू प्रसाद यादव यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहनसिंग यांनी फेटाळली आहे. लालू यांच्या बोलण्याकडे कोणीही गार्भियाने लक्ष देत नसल्याचे सिंग म्हणाले. बिहार सरकारमध्ये भागीदार असलेल्या लालुंच्या बोलण्याकडे खुद्द बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार देखील फारसे लक्ष देत नसल्याचा चिमटा सिंग यांनी काढला.