1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. LeT commander Bashir Lashkari killed in Anantnag

तोएबाचा टॉप कमांडर बशीरसह दोन दहशतवादी ठार

काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलाने शनिवारी सकाळी लष्कर ए तोएबाचा टॉप कमांडर बशीर लष्करीसह दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. गेल्या महिन्यात सहा पोलिसांना जिवे मारण्याच्या घटनेत बशीरचाही समावेश होता. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांचा पर्याय बनलेल्या बुरहान वानी आणि सबझार अहमद बटच्या खात्म्यानंतर भारतीय लष्कराला मिळालेले हे मोठे यश असल्याचे मानले जाते. 
 
शनिवारी सकाळी सुरक्षा दलांनी लष्करी आणि इतर ३ दहशतवाद्यांना एका घरात घेरले होते. पण स्थानिक लोकांच्या विरोधामुळे जवानांना ऑपरेशन राबवण्यात मोठी अडचण येत होती. अशा परिस्थितीतही जवानांना बशीर लष्करीला ठार करण्यात यश मिळाले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एका महिलेसमवेत दोन नागरिकांचाही मृत्यू झाला.
पुढील लेख
आझम खान विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल