1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Lion attacks herder in Bhavnagar

भावनगर मध्ये सिंहाचा गुराख्यावर हल्ला, दगडफेक करून गुराख्याची सुटका

गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात गर्जिया गावात सोमवारी सिंहानेगुराख्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक गुराखी जखमी झाला, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ६ जुलै रोजीची आहे. भावनगर जिल्ह्यातील पालिताना तालुक्यात गर्जिया गावात राहणारे कालूभाई भोगभाई गमरा नावाच्या गुराख्यावर ते घरा शेजारी असताना एका सिंहाने हल्ला केला. आपल्या गुरांना चारा देण्यासाठी बाहेर गेले.घटनेची माहिती मिळाल्यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सिंहावर दगडफेक करून गुराख्याच्या जीव वाचवला. 
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे,  ज्यामध्ये एक सिंह त्या माणसाचा हात आपल्या जबड्यात पकडून असल्याचे दिसत आहे आणि आजूबाजूचे लोक त्याला घाबरवून दगडफेक करून पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सिंह त्या भागातून जात होता, परंतु असे दिसते की त्याला चिथावणी देण्यात आली, ज्यामुळे तो आक्रमक झाला."
घटनेची माहिती मिळताच, स्थानिक वन विभागाचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वन विभाग सध्या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी परमार यांना भावनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते आता धोक्याबाहेर आहेत.
About Writer
प्रिया दीक्षित
प्रिया दीक्षित गेल्या ५ वर्षांपासून मीडिया क्षेत्रात कार्यरत असून सध्या त्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात Junior Sub Editor म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील प्रतिष्ठित जिवाजी विद्यापीठातून होमसायन्समध्ये पदवी आणि हिंदी या भाषत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तसेच त्यांच्याकडे कॉम्प्युटरचा डिप्लोमा देखील आहे. सनसनाटी पसरवण्याऐवजी प्रत्येक.... आणखी वाचा