सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 15 एप्रिल 2020 (13:41 IST)

येथे सुरू होणार दारूची ऑनलाइन विक्री, या दोन राज्यात तर 10-5 वाजेपर्यंत दुकानं उघडणार

21 दिवसांचा लॉकडाउन पूर्ण झाल्यानंतर आता दुसरा टप्पा सुरू झाला असून हा लॉकडाउन 3 मेपर्यंत सुरू राहणार आहे. अशात दारू न मिळत असल्याने परेशान लोकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या आठवड्यापासून पश्चिम बंगालमध्ये ऑनलाइन दारू विक्री सुरू होईल असे सांगितले जात आहे.
 
उत्पादन शुल्क विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यापासून लोक ऑनलाईन दारू विकत घेऊ शकतील परंतू याचा लाभ काही भागांमध्ये मिळणार आहे. यात घरपोच डिलिव्हरी केली जाणार आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने परवानगी दिल्यासच ऑनलाइन दारू विक्री करणारा दारूचा पुरवठा करू शकणार आहे.
 
उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकार्‍याप्रमाणे ही विक्री कायद्यातील तरतुदींवर अवलंबून आहे. 
 
तसेच दुसरीकडे आसाम आणि मेघालय या दोन राज्यातील सरकारने सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे. 17 एप्रिलपासून हा निर्णय लागू असणार आहे. तर मेघालयमध्ये 9 ते 4 या वेळेत मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्री करताना दुकानदारांनी कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टसिंगची काटेकोरपणे अमलबजावणी करण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत.