सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (10:31 IST)

लिव्ह इन पार्टनर महिलेची चाकू भोसकून हत्या

murder knief
दिल्ली येथील कालिंदी कुंज परिसरामध्ये रविवारी 30 वर्षीय एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. जिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला सॊबत राहणाऱ्या एका व्यक्ती विरोधात केस दाखल करण्यात आली आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेवर चाकूने हल्ला झाल्याची सूचना पोलिसांना मिळाली व पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना दिसले की, एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार एक 30 वर्षीय महिला तिच्या पार्टनर सोबत दक्षिण-पूर्व दिल्‍ली मधील कालिंदी कुंज परिसरात एका फ्लॅटमध्ये राहत होती. तसेच पोलिसांनी सांगितले की, मृत महिलेची लहान मुलगी आपल्या लहान भावासोबत दुपारी फ्लॅटमध्ये पोहचली. व तिने आपल्या आई ला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.  
 
अधिकारींच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या मुलीने या हत्येत तिच्या आईचा साथीदाराचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच अधिकारी म्हणाले, “आम्ही आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला पकडण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे.

Edited By- Dhanashri Naik