शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (10:05 IST)

8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आत्महत्या

suicide
राजधानी दिल्लीमधील केशवपूरम परिसरता 14 वर्षाच्या एका विद्यार्थिनीचा मृतदेह राहत्या घरी गळफासला लटकलेला आढळला. पोलिसांनी माहिती दिली की या विद्यार्थिनीने आत्महत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी आपल्या भावासोबत आणि बहिणीसोबत राहत होती. पोलीस आधिकारींनी सांगितले की सूचना मिळताच एका टीमला घटनास्थळी पाठवण्यात आले पण मृतदेहाजवळ कोणतीही चिट्ठी किंवा पत्र मिळाले नाही. 
 
तसेच पोलिसांनी या विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थिनीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या जिजाजींना फोन लावला होता व विद्यार्थिनीच्या बहिणीने आरोप केला आहे की त्यांचा भाऊ आणि वाहिनी तिचा छळ करायचेत. पोलिसांनी सांगितले की ते सर्व मुद्दे लक्षात घेऊन चौकशी करीत आहे 

Edited By- Dhanashri Naik