झोमॅटो डिलिव्हरी बॉयला कारने चिरडले  
					
										
                                       
                  
                  				  दक्षिण-पश्चिम दिल्ली मध्ये रस्ता पार करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉय ला एका कारने चिरडले. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठविला. 
				  													
						
																							
									  
	 
	पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झोमॅटो' एजंटचा सोमवारी रस्ता क्रॉस करीत असताना कार खाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर कार चालक फरार झाला असून, संशयीत आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच कार देखील जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, ऑनलाइन' खाद्य पूर्ती करणारे एप झोमॅटो' मध्ये काम करणाऱ्या या डिलिव्हरी बॉयचा मृतदेह पोस्टमोर्टमनंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.  
				  				  
	 
	मिळालेल्या माहितीनुसार हा डिलिव्हरी बॉय आपली मोटारसायकल घेऊन रस्ता क्रॉस करीत होता. या दरम्यान जलद येणाऱ्या कार ने या डिलिव्हरी बॉयला जोरदार धडक दिली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.  
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  Edited By- Dhanashri Naik