मंगळवार, 25 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (14:23 IST)

2 महिने उलटूनही हॉस्पिटलने जुळ्या मुलांना डिस्चार्ज दिला नाही

baby
आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी मंगळवारी आरोप केला की, दिल्लीतील एक खाजगी रुग्णालय येथे जन्मलेल्या जुळ्या मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देत नाही आणि त्यासाठी अधिक पैशांची मागणी करत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले  
 
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम दिल्लीतील मोती नगर येथील अपोलो क्रॅडल या रुग्णालयाने हे आरोप फेटाळून लावले असून पालकांनी परिस्थितीचे निराकरण करण्याचा प्रयत्न करूनही 'प्रतिसाद देत नाही' असे म्हटले आहे.
 
तसेच AAP नेत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर शेअर केलेल्या तक्रारीनुसार, 20 जुलै रोजी त्यांच्या आईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यापासून दोन्ही मुले एक मुलगा आणि एक मुलगी जवळपास 50 दिवस रुग्णालयात आहे. अपोलो क्रॅडलने एका निवेदनात म्हटले आहे की, "जेव्हा मुलाला 31 ऑगस्ट रोजी रुग्णालयातून सोडण्यात येणार होते, तेव्हा पालकांनी सहकार्य करण्यास नकार दिला आणि अयोग्य वर्तन केले. परिस्थिती सोडवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न केले तरीही, पालकांनी प्रतिसाद दिला नाही."
 
तसेच रुग्णालयाने सांगितले की पालकांना स्पष्टपणे सांगण्यात आले होते की त्यांची मुले 31 ऑगस्ट रोजी डिस्चार्जसाठी तयार होतील. मुलांच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीची माहिती देताना आप नेते संजय सिंह म्हणाले की, रुग्णालय अधिक पैशांची मागणी करत आहे.