गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (12:09 IST)

राजधानी दिल्लीमध्ये उष्मघाताने 45 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली मध्ये उष्माघाताने कमीतकमी 45 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. गुरुवारी एका अधिकारींनी माहिती दिली की, गेल्या काही दिवसांमध्ये राजधानी दिल्ली मध्ये भीषण उष्णता भडकली आहे. ज्यामुळे अनके लोकांना उष्णतेच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. 
 
राजधानी दिल्ली मध्ये रुग्णालयामध्ये उष्मघाताचे रुग्ण वाढत आहे. तसेच सफदरजंग रुग्णालयाच्या अधिकारींनीं सांगितले की, भीषण गर्मीमुळे 24 लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अधिकारींनी सांगितले की वाढत्या उष्णेतमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.