गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑगस्ट 2024 (11:27 IST)

राजधानी दिल्लीमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

राजधानी दिल्लीमध्ये न्यू अशोक नगर परिसरात एक नर्सिंगच्या विद्यार्थीने स्वतःला विषारी इंजेक्शन लावून आत्महत्या केली आहे. 22 वर्षीय विद्यार्थीने पीजी आत्महत्या केल्याची माहिती समोर अली आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून विद्यार्थिनीला रुग्णालयात दाखल केले पण तिला तिथे मृत घोषित करण्यात आले. विद्यार्थिनीच्या हाताला कॅन्युला जोडलेली होती. या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस घेत असून विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना या घटनेची सूचना देण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार या विद्यार्थिनीने आपल्या दोन्ही हातांमध्ये ड्रिप लावलेली होती. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पुढील चौकशी सुरु आहे.  

Edited By- Dhanashri Naik