बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (10:29 IST)

राजधानी दिल्लीत तलावात बुडून दोन लहान मुलांचा मृत्यू

water death
राजधानी दिल्लीमध्ये दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाह्य दिल्लीतील प्रेम नगर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी पावसाच्या पाण्याने भरलेल्या तलावात 9 आणि 15 वर्षांची दोन मुले बुडाली. पोलिसांनी ही माहिती दिली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाऊस पडल्यानंतर प्रेम नगर परिसरातील राणीखेडा गावातील जवळच्या वसाहतीतील चार मुले तलावात पोहण्यासाठी गेली होती. त्यातील दोघे खूप खोल पाण्यात गेले, अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवले. पुढील चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.