1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (09:23 IST)

पश्चिम बंगाल : वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टर नाईट ड्युटीवर होती, सकाळी आढळला मृतदेह

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळल्याने रुग्णालयात गोंधळ उडाली आहे. तसेच सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला. मृत महिला डॉक्टर पीजीटीची विद्यार्थिनी होती. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या चेस्ट मेडिसिन विभागात नाईट ड्युटीवर होत्या. शरीरावर जखमेच्या खुणा असल्याचे रुग्णालयने सांगितले.
 
पोलीस अधिकारींनी रुग्णालयाला भेट देऊन वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, डॉक्टरांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय पॅनेल तयार केले आहे. पुढील चौकशी सुरु झाली आहे