शनिवार, 7 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (09:12 IST)

24 राज्यांमध्ये पावसाचा इशारा, ओडिशाच्या 10 जिल्ह्यांमध्ये पुराचा इशारा;

monsoon update
हवामान खात्याने देशातील 24 राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे, तसेच ओडिशातील 10 जिल्ह्यांमध्ये पुराचा इशारा दिला असून हिमाचल प्रदेशात भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील 128 रस्ते बंद करण्यात आले आहेत.
 
मुसळधार पावसामुळे डोंगरात दरड कोसळण्याच्या घटना अजूनही थांबल्या नाहीत. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात शुक्रवारी डोंगरावरून पडलेल्या दगडाचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. ताईच दोन राष्ट्रीय महामार्गांसह 128 रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचवेळी पंजाब आणि हरियाणासह 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने देशातील 24 राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे, तसेच ओडिशातील 10 जिल्ह्यांमध्ये पुराचा इशारा दिला आहे.  
 
24 राज्यांमध्ये आठवडाभर मुसळधार पाऊस-
हवामान खात्याने सांगितले की, दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश आणि आसपासच्या भागात, राजस्थान आणि दक्षिण झारखंड आणि शेजारील भागात कमी दाबाच्या क्षेत्राच्या अगदी वरती चक्री वारे वाहत आहेत. त्यांच्या प्रभावामुळे 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पुढील सात दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. तसेच या व्यतिरिक्त छत्तीसगड, गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि सर्व सात ईशान्येकडील राज्यांमध्ये या काळात मुसळधार पाऊस पडू शकतो.