1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑगस्ट 2023 (14:55 IST)

West Bengal: फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, पाच जणांचा मृत्यू

West bengal
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यात रविवारी सकाळी फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जण ठार तर अनेक जण जखमी झाले. 
सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.कोलकात्यापासून उत्तरेला सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या दत्तपुकुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नीलगंजमधील मोशपोल येथील कारखान्यात अनेक लोक काम करत होते
/div>
 
अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत. स्फोटात अनेक लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मे महिन्यात पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील एग्रा येथील एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात असाच स्फोट झाला होता, ज्यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. 
 
दत्तपुकुरमधील बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन आगस्टेशन अधिकारी आशिष घोष यांनी सांगितले की, पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 
 




Edited by - Priya Dixit