बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (14:21 IST)

दिल्लीत अल्पवयीन मुलांनी सुरक्षा रक्षकाची चाकूने हत्या केली

murder knief
राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून नोकरीवरून काढून टाकल्याचा राग आलेल्या अल्पवयीन मुलांनी मिळून चाकूने  हत्या केला. याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून नोकरीवरून काढून टाकल्याचा राग आल्याने अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसह सुरक्षा रक्षकावर चाकूने वार करून त्याची हत्या केली आहे. तसेच आरोपीं घटनास्थळावरून फरार झाले.
 
तपासादरम्यान पोलिसांनी याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांना अटक केली. बुधवारी रात्री रघुबीर नगर बी ब्लॉकमध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची सूचना पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याप्रकरणी चार अल्पवयीन मुलांना अटक केलीअसून चौकशीमधून समोर आले की, मृतव्यक्ती ज्या कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होते, त्याच कारखान्यात एक अल्पवयीन आरोपी काम करत होता. या सुरक्षक रक्षकाने अल्पवयीन मुलीच्या वागणुकीची तक्रार कारखाना मालकाकडे केली होती. या तक्रारीनंतर अल्पवयीन मुलाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. यामुळे अल्पवयीन मुलगा चांगलाच राग आला होता. बदला घेण्याच्या उद्देशाने त्याने साथीदारांसह सुरक्षा रक्षकाची चाकूने वार करीत हत्या केली.