महाराष्ट्रासोबत या राज्यांमध्ये आणि राजधानी दिल्ली-NCR मध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट
देशभरात सध्या मान्सून सक्रिय आहे. अनेक राज्यांमध्ये पाऊस दरम्यान लोक गर्मीमुळे त्रस्त झालेले आहे. तर अनेक ठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे थंडावा निर्माण झालेले आहे. तसेच अनेक क्षेत्रांमध्ये नाडींना पूर आलेला आहे तर अनेक ठिकाणी भूस्खल झालेले आहे.
राजधानी दिल्लीमध्ये 1 ऑगस्ट पासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय होऊन ट्रॅफिक विस्कळीत झाला आहे. हवामान विभागाने दिल्ली सोबत 15 राज्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट घोषित केला आहे. दिल्ली-NCR मध्ये आज सकाळी हलकासा पाऊस पडला आहे.
तसेच हवामान विभागानुसार 25 ऑगस्ट पर्यंत दिल्ली मध्ये पावसाचा यलो अलर्ट घोषित करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट-
हवामान विभागानुसार येत्या 24 तासांमध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, लक्षद्वीप, छत्तीसगड, झारखंड, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि लेह लद्दाख सोबत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो.
Edited By- Dhanashri Naik