रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2024 (10:29 IST)

वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

suicide
दक्षिण-पश्चिम दिल्लीतील इंद्रप्रस्थ विद्यापीठात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितनुसार रविवारी एका 25वर्षीय विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. 

अधिकारींनी या घटनेची माहिती दिली. मृत विद्यार्थी हा बिहारचा रहिवासी असल्याचे सांगितले जात असून तो आयपी विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेत होता.

तसेच सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांकडूनही चौकशी करण्यात येत आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.