रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (16:23 IST)

माजी उपमुख्यमंत्री सरकारी बंगला रिकामा करणार

manish sisodia
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही सरकारी बंगला रिकामा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ते पंजाब मधील आप राज्यसभा खासदार हरभजन सिंह यांच्या सरकारी निवास्थानी राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अरविंद केजरीवालदेखील आप राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या घरामध्ये उद्या स्थायी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 
  
मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेले नाही. पण ते दिल्लीचे आमदार जरूर आहे. दिल्लीमध्ये आमदारांना सरकारी निवास्थान मिळत नाही, याकरिता हे दोन्ही आमदार आप राज्यसभा खासदारांच्या निवासस्थानी राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik