रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024 (15:45 IST)

दुखापतीच्या बहाण्याने आलेल्या दोन तरुणांनी डॉक्टरवर झाडल्या गोळ्या

राजधानी दिल्लीच्या जैतपुर परिसरामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. रुग्णालयात घुसून डॉक्टरवर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार हे दोन तरुण दुखापत झाली म्हणून रुग्णालयात आले तसेच पहिले त्यांनी ड्रेसिंग केली मग डॉक्टरला दाखवायचे आहे म्हणून सांगितले आणि डॉक्टरच्या केबिन मध्ये जाताच डॉक्टरवर गोळ्या झाडल्या. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजवायरल झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. 
 
दोन्ही आरोपींनी डॉक्टरला गोळी का मारली, त्यांचे काही शत्रुत्व होते का?, याचा पोलीस शोध घेत असून लवकर आरोपींना ताब्यात घेण्यात येईल असे पोलीस अधिकारींनी सांगितले. 

Edited By- Dhanashri Naik