1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

विधानसभा निवडणूक 2017 तील काही विशेष बिंदू

Live Update : विधानसभा निवडणूक 2017
उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची मतमोजणी सुरू आहे. आता नजर टाकू या काही विशेष बिंदूवर:
डेहराडून : हरिश रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल के. के. पॉल यांच्याकडे सुपूर्द केला
- आम्ही नम्रपणे विजय स्वीकारला आहे, विकासासाठी अथक प्रयत्न करू- अनंत कुमार, केंद्रीय मंत्री
- मणिपूर विधानसभा निवडणूक अंतिम निकाल : भाजप २१, काँग्रेस २८, एलजीपी १, एनपीएफ ४, एनपीपी ४, अन्य २
- इव्हीएम यंत्रासंदर्भातल्या मायावतींच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी - लालू प्रसाद यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री
- गोवा निवडणूक निकाल- काँग्रेस 17, भाजपा 13, एनसीपी 1, एमजीपी 3, जीएफपी 3, अपक्ष 3
- मणिपूर निवडणूक निकाल- भाजपा 21, काँग्रेस 26, एनपीपी 4, एलजेपी 1, एआयटीसी 1, अपक्ष 1
- नवी दिल्ली- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा
- मायवतीच्या इव्हीएम घोटाळ्यांच्या आरोपांना कोणीही गांभीर्यानं घेत नाही- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
- नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या जनतेचे धन्यवाद, भाजपचा हा ऐतिहासिक विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय - नरेंद्र मोदी
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मतदारांचे मानले आभार
- उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये जातीवाद आणि घराणेशाहीला नाकारलं आहे- अमित शाह
- स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपाला एवढं मोठं यश मिळालं आहे- अमित शाह
- गरीब जनता मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे- अमित शाह
- हा जनतेच्या इच्छाशक्तीचा विजय - अमित शाह
- भाजपा चार राज्यांत सरकार स्थापन करणार आहे- अमित शाह
- मतदानाच्या कलांनुसार पंजाबमध्ये काँग्रेसला 76, आप 23 आणि अकाली दल 18 जागांवर आघाडीवर
- मतदानाच्या कलांनुसार भाजपा 315, सपा आघाडी 66 आणि बसपा 18 जागांवर आघाडीवर
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील ज्येष्ठ काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विजय आणि वाढदिवसासाठी अभिनंदन केले
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याशी चर्चा केली, विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
- 2014 निवडणुकीत अशीच शक्यता वर्तवण्यात आली होती - मायावती
- उत्तर प्रदेशमध्ये व्होटिंग मशीन मॅनेज करण्यात आल्या मायावतींचा गंभीर आरोप
- मणिपूरमध्ये काँग्रेस 10 तर भाजपा 8 जागांवर विजयी, अन्य पक्षांच्या खात्यात 4 जागा
- गोव्यातील काँग्रेस आणि भाजपात अटीतटीची झुंज काँग्रेस 10 तर भाजपा 11 आणि इतर 7 जागांवर आघाडीवर
- मणिपूरमध्ये अटीतटीच्या लढतीत भाजपा 16 तर काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर, इतर 11 जागांवर आघाडीवर
- आज संध्याकाळी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार
- उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत दोन्ही मतदारसंघातून पराभूत
- गोव्यात काँग्रेस 11 तर भाजपा 9 जागांवर आघाडीवर
- मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत, सध्या 41 जागांवरील कलांमध्ये भाजपा 17 आणि काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर, तर इतर 7 जागांवर आघाडीवर
- उत्तराखंडमध्ये भाजपा मोठ्या बहुमताच्या दिशेने, भाजपाकडे 54, काँग्रेस 12 तर इतर 4 जागांवर आघाडीवर
- पंजाबमध्ये काँग्रेसची मुसंडी, काँग्रेस 72, आप 26 तर अकाली दल 19 जागांवर आघाडीवर
- उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची आघाडी तीनशेपार, भाजपा 306 जागांवर आघाडीवर, सपा 71 आणि बसपा 21 आणि इतर 9 जागांवर आघाडीवर
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आज दुपारी घेणार राज्यपाल राम नाईक यांची भेट
- उत्तराखंड - मुख्यमंत्री हरीश रावत हरिद्वार ग्रामीण मतदारसंघातून पिछाडीवर.
- काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठी मतदारसंघात भाजपच्या गरिमासिंह आयघाडीवर तर काँग्रेसच्या अमिता सिंह पिछाडीवर.
-  उत्तरप्रदेशात भाजपाची रेकॉर्डब्रेक आघाडी, 1991 नंतर पहिल्यांदाच इतकं बहुमत
- प्रचंड बहुमताच्या आधाराव आम्ही सरकार स्थापन करणार. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी देशाच्या हितासाठी नव्हती - योगी आदित्यनाथ, भाजपा खासदार
- मणिपूर : इरोम शर्मिला पराभूत, मुख्यमंत्री ओक्राम इबोबी सिंग थौबल येथून विजयी.
- पंजाब - काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल जखार अभोर येथून ३४८५ मतांनी पिछाडीवर.
- उत्तर प्रदेशमध्ये 400 जागांपैकी 281 जागांवर भाजपाकडे आघाडी
- मणिपूरमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत, भाजपा 11, काँग्रेस 10 आणि इतर पक्ष 6 जागांवर आघाडीवर
- गोव्यात काँग्रेस आघाडीच्या दिशेने काँग्रेस 8, भाजपा 5 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर
- पंजाबमध्ये काँग्रेस 55, आकाली दल+भाजपा आघाडी 26 आणि आप 22 जागांवर आघाडीवर
- पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू अमृसर पूर्व मतदारसंघातून आघाडीवर
- उत्तराखंडमध्ये भाजपा 50 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 16 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर
- उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा वारू चौफेर उधळला, आतापर्यंत आलेल्या कलांमध्ये भाजपा 270, सपा 70 आणि बसपा 27 आणि इतर 12 जागांवर आघाडीवर
गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव, मांद्रे मतदारसंघातून लढवली होती निवडणूक.
- उत्तर प्रदेशमध्ये भाजपा 236 जागांवर आघाडीवर, सपा 68 आणि बसपा 31 तर इतर 10 जागांवर आघाडीवर
- पंजाबमध्ये काँग्रेसला आघाडी, काँग्रेस 52, अकाली दल 26 आणि आप 21 जागांवर आघाडीवर
- पंजाबमध्ये काँग्रेसला 42 जागांवर आघाडी, आप 21 जागांवर तर अकाली दल 18 जागांवर आघाडीवर
- उत्तर प्रदेशमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला बहुमत, सध्या भाजपाकडे 205 जागांवर आघाडी
- मणिपूरमध्ये काँग्रेस आघाडीवर, काँग्रेस 7, भाजपा 3 आणि इतर 3 जागांवर आघाडीवर
- मणिपूर : सुरुवातीच्या कलांमध्ये इरोम शर्मिला पिछाडीवर
- उत्तर प्रदेशमध्ये भाजपा मोठ्या आघाडीकडे, भाजपा 187, सपा 42 आणि बसपा 28 धावांवर आघाडीवर
- उत्तराखंडमध्ये भाजपा 43 काँग्रेस 20 आणि इतर 4 जागांवर आघाडीवर
- उत्तर प्रदेशमध्ये जसवंतनगर येथून सपाचे शिवपाल यादव पिछाडीवर
- गोव्यात काँग्रेस 6 तर भाजपा 2 जागांवर आघाडीवर 
* कैंटमध्ये मुलामय सिंग यांची सून अर्पणा रिता बहुगुणाहून मागे
* यूपीमध्ये भाजप पुढे
* कानपुर: किदवईहून भाजप पुढे
* पंजाबमध्ये काँग्रेस पुढे
* यूपीमध्ये बीएसपी तिसर्‍या क्रमांकावर

* मऊ मध्ये मुख्तार अंसारी पुढे
* कुंडाहून राजा भईया पुढे