शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2017 (22:30 IST)

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अनिश्चित काळासाठी उपोषण करणार

मध्यप्रदेशचे  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यातील शांततेसाठी ते अनिश्चित काळासाठी उपोषण करणार असल्याचे  त्यांनी स्पष्ट केले.  मध्य प्रदेशात सलग चौथ्या दिवशी हिंसक आंदोलन झालं. आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक गाड्या जाळल्या, तर काही ठिकाणी पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान मंदसौरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर भाजपकडून काँग्रेसवर आरोप करण्यात आले आहेत. त्यातच काँग्रेस नेत्यांच्या भडकाऊ भाषणाचे व्हिडिओ समोर आल्याने भाजपच्या आरोपांना आणखी बळ मिळालं आहे.