बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (16:14 IST)

मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले, पतंजली आयुर्वेदला तब्बल दहा लाखांचा दंड ठोठावला

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने प्रतिकारक क्षमता वाढवत असल्याचा दावा करत कोरोनील हे औषध बाजारात आणले. या औषधावरून मद्रास हायकोर्टाने बाबा रामदेव यांना फटकारले आहे. तसेच न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला तब्बल दहा लाखांचा दंड ठोठावला आहे.
 
बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली ही लोकांच्या मनातील भीतीची फायदा घेत हे औषध बाजारात आणले आहे. त्यामुळे लोकांना हे औषध कोरोनावरील औषध असल्याचे वाटतेय. खरं तर हे औषध फक्त ताप, सर्दी, खोकला यावरचे आहे. असे न्यायालयाने सांगत पतंजलीला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. चेन्नईतील अद्यार इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पतंजली विरोधात याचिका दाखल केली आहे. या कंपनीचा कोरोनील या नावाने ट्रेडमार्क 2027 सालापर्यंतसाठी रजिस्टर आहे. पतंजलीने या नावाने औषध बाजारात आणताना ते नाव रजिस्टर आहे की नाही हे तपासणे गरजेचे होते असे या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने पतंजलीला कोरोनील हे नाव न वापरण्याचे आदेश दिले आहेत.
 
सोबतच पतंजलीने अद्यार कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि गव्हर्नमेंट योग अॅण्ड मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल ला पाच पाच लाख रुपये प्रत्येक देण्याचे आदेश न्यायालयाने पतंजलीला दिले आहेत.